Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका चिटणीसपदी रोहन महाजन

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील रोहन महाजन यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

 

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी युवक काँगेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून  ‘युवा जोडो संपर्क अभियानांतर्गत’   आयोजित बैठकीत रोहन महाजन यांची तालुका चिटणीसपदी निवड करण्यात आली.   या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष  प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, युवकचे हितेश गजरे आदी पदधिकारी  उपस्थित होते. दरम्यान ,  तालुका चिटणीस पदाचे नियुक्तीपत्र  रोहन महाजन यांना  राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष रवीन्द्र नाना पाटील व तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले सर  यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे आदिवासी आघाडीचे एम. बी. तडवी सर , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मन्यार , युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील, नगरसेवक राकेश कोलते , प्रशांत पाटील, गनी खान. महीला कार्यकारणीच्या अध्यक्ष व्दारकाबाई श्रीनिवास पाटील ,  शामल भावसार , उज्वला कोळी, भुषण नेमाडे आदीनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.

Exit mobile version