राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे कोरोना महामारीच्या काळात सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांप्रति आपले कर्तव्य पणाला लावून शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत शिक्षण सुरु ठेवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू  डॉ. के. बी. पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री सतिष पाटील,  जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील,  उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्ष कल्पनाताई पाटील , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील , महानगर सचिव कुणाल पवार, शहराध्यक्ष स्वप्निल नेमाडे  हे होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतामध्ये माजी कुलगुरू के. बी. पाटील यांनी शिक्षकांनी आपले कार्य  जबाबदारी करावे.ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जावे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांची होणारी तारेवरची कसरत आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याविषयीं मोलाचे मार्गदर्शन केले.  शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.तसेच डॉ. सतिष पाटील व जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन  सागर पाटील तर आभार  मनोज भालेराव यांनी मानले.  याप्रसंगी शिक्षक आघाडी कार्यकारणीतील सदस्य महानगर अध्यक्ष हेमंत सोनार , महानगर सचिव प्रवीण धनगर , महानगर कार्याध्यक्ष मनोज भालेराव , महानगर सरचिटणीस सागर पाटील , महानगर सहसरचिटणीस पंकज सूर्यवंशी ,  महानगर उपाध्यक्ष विजय विसपुते आदींनी कामकाज पहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2212526008890058

 

Protected Content