Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ना. पाटील यांच्या दौऱ्यानिमित्ताने बैठक (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील हे पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यासंदर्भातील महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यलयात जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील हे ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ अंतर्गत तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर ११ ते १३ फेब्रुवारी रोजी येणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  व युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकचे सर्व जिल्हापदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष,शहरअध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस ललित बागुल, जिल्हा अध्यक्ष युवक वाय. आर. पाटील सर, जिल्हा समन्वयक आबा पाटील, जामनेर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version