Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन विविध उपक्रम राबवून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

 

राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांच्या हस्ते पक्ष ध्वज फडकविण्यात आला. यानंतर पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. यात त्यांनी शरद पवार यांच्या सक्षम नेतृत्वात आपल्याला काम करायला मिळत आहे हे आपले भाग्य असल्याचे मत मांडले. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व पवार साहेबांची विचारधारा , कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी व जास्तीत जास्त जनहिताचे कार्य करावे म्हणजे जळगाव जिल्ह्यात देखील सर्व नगरपालिका , जिल्हा परिषद , महानगरपालिका ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असे मत त्यांनी मांडले. यानंतर केक कापुन सर्वांनी एकमेकांना पक्ष वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पक्षातील जेष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मोटरसायकल रॅलीचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून स्वातंत्र्य चौक , नेहरू चौक , चौबे शाळा , चित्रा चौक , कोर्ट चौक या मार्गाने शहारातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली व रॅलीची सांगता राष्ट्रवादी कार्यालयासमोर झाली . सदर रॅलीत कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात जोरदार घोषणा देत आसमंत दणाणून सोडले , मोटरसायकल रॅलीत सुमारे १५० मोटरसायकल व ३०० कार्यकर्ते सहभागी झाले.

या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील , जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस एजाज मलिक , जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील , विकास पवार , महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटील , वाल्मिक पाटील , रिकू चौधरी , अमोल कोल्हे , अरविंद मानकरी , मजहर पठाण , राजू मोरे , रवी देशमुख , अश्विनीताई देशमुख , कल्पिता पाटील , अॅड. राजेश गोयर , दत्तात्रय सोनवणे , भगवान सोनवणे , सुशील शिंदे , सुनील माळी , अशोक सोनवणे , रमेश बाऱ्हे , अनिल पवार , अकिल पटेल, रहीम तडवी , जितेंद्र चांगरे , विशाल देशमुख , किरण राजपूत , नईम खाटिक , राहुल टोके , जितेंद्र बागरे , सूर्यकांत भामरे, राजू बाविस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वाय. एस. महाजन सर यांनी केले तर आभार रिकू चौधरी यांनी मानले.

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

Exit mobile version