Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे शरद पवार सहस्त्रचंद्र दर्शन सप्ताहास प्रारंभ (व्हिडिओ)

जळगाव,प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त १२ ते १९ डिसेंबर दरम्यान शरदचंद्रजी पवार साहेब सहस्रचंद्र दर्शन सप्ताहचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सप्ताहाची सुरुवात आज दि. १२  डिसेंबर रोजी सकाळी १०.१०  वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष अॅॅड. रवींद्र पाटिल यांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली.

 

दि. १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या चि. नैतिक टोके व इतर लहान मुलांचा देखील वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात स्क्रिनवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व पक्षाचे जेष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करुन मार्गदर्शन केले. १०० गरजू व विधवा महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात साड्यांचे वाटप करण्यात आले . भजे गल्ली येथील संत गाडगेबाबा निराधार निवारा केंद्र येथील गरजु वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. शहरातील इतरही निराधार गरजु व्यक्तींना १०० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. बळीराम पेठ भागांतील ५०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप वह्या व ब्लँकेट वाटप महापौर जयश्री महाजन व पक्षाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रिमांड होम येथील मुले व मुलींसाठी तुकडा एकांकिचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब अॅड. रवींद्र पाटील , जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , जळगाव जिल्हा निरीक्षक सौ. शिंदे , जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी , कल्पना पाटील , महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील , सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन सर , जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील , वाल्मिक पाटील , मजहर पठाण , सुनील माळी ,अमोल कोल्हे , रमेश बाऱ्हे , कल्पिता पाटील , योगेश देसले, माजी नगरसेवक राजू मोरे , सुशील शिंदे , विशाल देशमुख , किरण राजपूत , राजेश पाटील , अभिषेक पाटील , अॅड. सचिन पाटिल, स्वप्नील नेमाडे , मीनाक्षी चव्हाण , सलीम ईनामदार , आरोही नेवे , डॉ. रिजवान खाटिक , रोहन सोनवणे , राहुल टोके, किरण चव्हाण , अक्षय वंजारी , अकिल पटेल , नईम खटिक, साजिद पठाण आदी उपस्थित होते.

दरम्यान, उद्या दि. १३ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सदर शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर तर्फे करण्यात येत आहे.

भाग १

भाग २

Exit mobile version