Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे सत्तारांचा पुतळा जाळून निषेध

मुक्ताईनगर –  लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी  संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुक्ताईनगरच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी  अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची व हिंदू बांधवांच्या भावना दुखावणारा हर हर महादेव चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली

 

 

निवेदनाचा आशय असा की,  खासदार सुप्रीयाताई सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या असून त्यांनी संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न हा बहुमान मिळाला आहे.  अशा महिला नेत्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अत्यंत गलिच्छ आक्षेपार्ह विधान केले असून त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  मुक्ताईनगरच्या वतीने निषेध करतो.  राज्याच्या मंत्री पदावर असणाऱ्या एखादया व्यक्तीने महिला लोकप्रतिनिधी बद्दल असे विधान करणे म्हणजे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्या सारखे आहे. अशा हीन वृत्तीच्या व्यक्तीने मंत्री पदावर राहणे योग्य नाही तरी त्यांचा त्वरित राजिनामा घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी  महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील सर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, जि. प. सदस्य निलेश पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे, रामभाऊ पाटील, बी. डी. गवई, डॉ. बी. सी. महाजन, सरचिटणीस रविंद्र दांडगे, सुनिल काटे, रणजित गोयनका, नंदकिशोर हिरोळे, हरिष ससाणे, एजाज खान, पवन डी. पाटील, सुभाष पाटील, प्रविण कांडेलकर, प्रशांत भालशंकर, रउफ खान, शरीफ मेकॅनिकल, कैलास कोळी, जे. के. चौधरी, गोपाळ पाटील, भाऊराव पाटील, विनोद काटे, अजय तळेले, मयुर साठे, जुबेर अली, इरफान खान, वहाब खान, हाशम शाह, मुस्ताक मण्यार, नजिम खान, अयाज पटेल, फारूक सैय्यद, समीर शेख, फिरोजभाई आदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Exit mobile version