Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीने केले आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणी चौक या ठिकाणी सुरु असलेले सर्कलचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता आकाशवाणी चौकात सुरू असलेले काम बंद करून आंदोलन केले.

 

निवेदनाचा आशय असा की, शहरातील महाबळ कॉलनी, संभाजी नगर, रायसोनी नगर, आदर्श नगर, रामानंद नगर, मोहाडी रोड परिसरातील नागरीकांचा येण्या-जाण्यासाठी या चौकातून मोठ्या प्रमाणावर व सातत्याने वापर होत असतो. या ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे ट्रॅफीकला अडथळा निर्माण होत आहे. तरी सदर निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, तरी याविषयी चौकशी करून सर्कलचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा. सदरहू बांधकाम न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यापुर्वी दिला होता. त्यानुसार गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता आकाशवाणी चौकातील सुरू असलेल्या सर्कलचे काम बंद करून त्याठिकाणी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहरातध्यक्ष मंगला पाटील, अमोल कोल्हे, सुनील माळी, राजू मोरे, सुशील शिंदे, किरण राजपूत, विशाल देशमुख, अनिल पवार, अशोक सोनवणे , डॉ रिजवान खाटिक, नईम खाटीक आदी उपस्थित होते.

भाग १

भाग २

Exit mobile version