Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्षांची निर्घुण हत्या !

सांगली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे (वय 41, रा. वाघमोडेनगर) यांची धारधार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे.

 

 

मिरज औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या हॉटेल अशोका समोर रोहिणी ऍग्रोटेक कोल्ड स्टोअरेजमध्ये येथे शुक्रवारी (१० जुलै) दुपारी ही घटना घडली. तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी दत्तात्रय पाटोळे यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आर्थिक वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून दत्तात्रय पाटोळे (वय ४५, रा. कुपवाड) यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी ते दुचाकीवरून कुपवाडमधून सांगली शहराकडे निघाले होते. मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये रोहिणी कोल्ड स्टोअरेजजवळ त्यांना तिघांनी अडवले. दुचाकी थांबताच हल्लेखोरांनी तलवार आणि चॉपरने पाटोळे यांच्यावर हल्ला केला. यावेळी पाटोळे हे जीव वाचवण्यासाठी जवळच्याच रोहिणी कोल्ड स्टोअरेजच्या दिशेने पळत सुटले. हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांना गाठले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर आणि शरीराव धारधार शस्त्राने वार केल्याने पाटोळे यांचा जागीच मृत्यू झाला.

Exit mobile version