राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारांमुळेच घडले शिवाजी महाराज – सुरवाडे

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणी संस्कार दिले. त्यामुळेच राजे छत्रपती शिवाजी महाराज घडले असे प्रतिपादन उपप्राचार्य उत्तम सुरवाडे यांनी केले.
भुसावळ, कला ,विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात एन. एस. एस., यांनी आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमप्रसंगी पर्यवेक्षक शोभा तळेले, समन्वयक प्रा. टी.एस. सावंत, समन्वयक प्रा. आर. एम. खेडकर, समन्वयक स्वाती पाटील, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भंगाळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एच. सरोदे, प्रा. जे. डी. धांडे, प्रा. आर. पी. मसाने, प्रा. एल. पी. टाक. प्रा. व्ही. डी. सावकारे, प्रा. एच. बी. राजपूत. शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री भंगाळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content