रावेर शहरासह परिसरात ‘प्ल्यू’ आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ; दवाखाने फुल्ल

रावेर प्रतिनिधी । रावेर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात फ्ल्यू’ची साथ पसरत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात रुग्ण दवाखान्यात दिसतात रविवारपासून फ्ल्यु’ची साथची चांगलीच वाढ झालेली असल्याने दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांना सर्दी, पर्स, ताप, डोके दुखणे, सारखे लक्षणे जाणवत आहे. मागील दोन-तीन दिवसां पासून वातावरणात प्रचंड बदल झाल्याने यात वाढ झाली आहे. तसेच खाजगी दवाखान्यांसह ग्रामीण रुग्णालयात सुद्धा परिसरातील नागरिक येत आहे. फ्ल्यू’ घरात एका व्यक्तीला त्याची लागण झाल्यास तो अतिवेगाने होते . त्यामुळे घरातील इतर नागरिकांनाही होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

साथीत घ्यावयाची खबरदारी

पाणी गाळुन प्याये स्वच्छता राखावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे उघड्या वरील पदार्थ खाणे टाळावे , खोकलतांना रुमाल वापरावा व लगेच डॉक्टरांना दाखवावे अश्या सूचना डॉक्टरां तर्फे करण्यात आल्या आहेत .

असे आहे फ्ल्यू’चे लक्षणे

अस्वच्छते अभावी देखील अनेक रोग पसरतात . मागील दोन तीन दिवसानपासून फ्ल्यू’चे अनेक रुग्ण आढळत आहे. फ्ल्यु’चे लक्षणे मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला,ताप, आढळतो एकास झाल्यास त्याच्या संर्पकात येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखिल फ्ल्यू’चे लक्षणे आढळतात

सर्दी खोकला ताप मोठ्या प्रमाणात लहान मुलांना जाणवत आहे. त्याच प्रमाणे मोठ्या व्यक्तीला सुध्दा असेल लक्षणे दिसत आहे.यामुळे रावेर शहरातील सर्व हॉस्पिटल फूल झाले आहे तासोंतास उपचारार्थ नंबर लावून बसवे लागत आहे.  फ्ल्यू टाळण्यासाठी घरातच रहावे बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असा सल्ला डॉक्टराकडून देण्यात आला आहे.

Protected Content