Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे सोशल डिस्टन्सिंग पाळून साध्या पद्धतीने विवाह

रावेर, प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेली संचारबंदीचे नियम लक्षात घेऊन येथील पत्रकार देवलाल पाटील यांच्या कन्येचा विवाह घरातच पाच-दहा पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निर्णयाचे शहर व परिसरात कौतुक होत आहे.

सध्या कोरोना संचारबंदीमुळे अनेकांनी शुभविवाहाच्या तारीख निश्चित होऊनही सदर विवाह धामधुमित करण्यासाठी पुढील वर्षी करण्याचा निश्चय केला आहे. तर काहींनी ठरलेल्या तारखेस विवाह सोहळा करण्याचा निर्णय मोजकेच वधू वर पित्यांनी घेतला आहे. वधू वर पक्षाकडील मोजकेच दहा बारा पाहूण्यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंग पाळून विवाह सोहळा घरातल्या घरात पार पडत आहेत . मुंजलवाडी ( ता. रावेर ) येथील रहिवासी व सध्या रावेर येथे स्थायिक असलेले दैनिक तरुण भारतचे पत्रकार देवलाल पाटील यांची कन्या चि .सौ. कां रूपाली, व अंजनसोंडे ( ता. भुसावळ ) येथील कै . छगन तुळशीराम पाटील यांचे सुपुत्र चि. सचिन यांचा शुभविवाह दोन महिन्यापूर्वीच २ मे रोजी करण्याचा निश्चित झाला होता. वर-वधू पक्षाकडील मंडळींनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा उरकून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व काल रोजी सोशल डिस्टिंक्शन पाळून कोणताही गाजावाजा न करता हा विवाह सोहळा मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . या निर्णयाचे शहर व परिसरात कौतुक व स्वागत होत आहे .

Exit mobile version