Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तेली समाजाचे अराध्य दैवत संत शिरोमणी प.पु.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रावेर तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महाराजांच्या मुर्तीची पालखीतुन टाळमृदुंगाच्या, विठु नामाच्या गजरात भव्य मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.

येथील विखे चौकातील तेली पंच भुवन येथुन संताजी महाराज यांच्या मुर्तीची सजविलेल्या पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी कर्की येथिल भजनी मंडळ होते. शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, महात्मा गांधी चौक, डॉ. हेडगेवार (चौराहा) चौक, मेन रोड, महाराजा अग्रसेन महाराज चौक, पाराचा गणपती विखे चौक, तेली पंच भुवन, तेली समाज नियोजीत मंगल कार्यालय जागा, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, गौशाळे जवळ येथे सांगता झाली. या नंतर आयोजित कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा देणगिदार व सहकार्य करणा-यांचा तसेच कै. सोनाबाई तुकाराम चौधरी व कै. तुकाराम किटकुल चौधरी यांना वारस नसल्याने त्यांच्या पश्चात त्यांची आसलेली जागेची विक्रि होवून एक लाख आकरा हजार रूपये त्यांच्या नातेवाईकांनी ती रक्कम समाजास देणगी दिली. म्हणून त्यांच्या नातेवाईकांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच क्रिडा व अन्य क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर मा. नगराध्यक्ष दारा मोहंमद, पद्माकर महाजन, हरीश गणवाणी, ज्ञानेश्वर महाजन , माजी नगरसेवक राजेंद्र महाजन, माजी नगरसेविका शारदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, धनंजय चौधरी, सुधाकर महाजन, अशोक शिंदे, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

तिर्थप्रसाद व भंडारा
यावेळी अध्यक्ष सुभाष चौधरी, उपाध्यक्ष हिरामण चौधरी, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, सचिव संजय चौधरी, सहसचिव चंद्रकांत चौधरी, खजिनदार ज्ञानेश्वर चौधरी, संजय चौधरी, भुषण महाजन, सुनील चौधरी, अंबादास चौधरी, शांताराम चौधरी, दिनेश चौधरी, संतोष चौधरी, भगवान चौधरी, लिलाचंद चौधरी नारायण चौधरी, अशोक चौधरी, विनोद चौधरी, भागवत चौधरी, किरण चौधरी, निलेश चौधरी, पंकज चौधरी, महेश चौधरी, राहुल चौधरी, सुमित चौधरी, गणेश चौधरी, यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन चंद्रकांत चौधरी यांनी केले रावेर तेली समाज पंच मंडळातील सदस्य, समस्त तेेली समाज बांधव, महिला मंडळ, युवक वर्ग या सह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येनेे कार्यक्रमास उपस्थित होते.

Exit mobile version