Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे रंगपंचमी व्याख्यानमालेचे आयोजन

रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे ६ ते १० एप्रिल दरम्यान होणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २१ वर्षांची परंपरा असलेल्या या व्याख्यान मालेचे विश्वस्त आणि पदाधिकारी यांनी आज वक्ते आणि विषय यांची घोषणा केली.

रंगपंचमी व्याख्यान मालेचे विश्वस्त व पदाधिकारी यांनी जाहीर केलेले वक्ते व विषय पुढीलप्रमाणे- ६ एप्रिल २०२२- बुधवार- वक्ते – बबनराव काकडे- नाशिक -विषय- स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने. ७ एप्रिल २०२२ – गुरुवार वक्त्या – श्रीमती शिवाली देशपांडे- नागपूर.- विषय- सैनिकांचे जीवन. ८ एप्रिल २०२२ – शुक्रवार वक्ते – गणेश शिंदे- पुणे.- विषय- जीवन सुंदर आहे. ९ एप्रिल २०२२- शनिवार. अंबरीश पुंडलिक, जळगाव जामोद. विषय – नेताजी सुभाषचंद्र बोस. १० एप्रिल २०२२ – रविवार. वक्त्या- शीतल मालुसरे.- महाड (रायगड)- विषय- नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा अपरिचित इतिहास या विषय व व्क्तांचा समावेश आहे. या व्याख्यानांसाठी जैन इरिगेशन, जळगाव आणि प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील (शेंदुर्णी) यांचे सहकार्य लाभले आहे. ही व्याख्याने येथील सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये रोज संध्याकाळी ६:३० वाजता होतील. श्रोत्यांनी मास्क आणि सोशल डिस्टनसिंगसह उपस्थितीचे आवाहन विश्वस्त डॉ. राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य, अध्यक्ष अनिल महाजन, सचिव कैलास वानखेडे आणि कार्यकारिणीने केले आहे.

Exit mobile version