Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथील कोरोना बाधीताचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी । येथे कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या प्रौैढाचा आज जळगावच्या कोविड रूग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला असून वैद्यकीय अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रावेर येथे आजवर कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. तथापि, आधी तालुक्यातील सावदा येथे दोन रूग्ण आढळून आले होते. यानंतर रावेर शहरात ५८ वर्षाचा रूग्ण आढळून आला होता. या रूग्णावर जळगाव येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना आज त्याची प्राणज्योत मालवली. या वृत्ताला रावेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, मयताच्या संपर्कात आलेल्यांना आधीच क्वॉरंटाईन करण्यात आले असून आता अतिशय काळजीपूर्वक या मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version