Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर-यावल विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टीची ‘व्हर्चुअल ‘ सभा

रावेर, प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी च्या वतीने गुरुवार दि. ९ जुलै रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता व्हर्चुअल ‘व्हर्चुअल ‘ सभेचे (ऑनलाईन सभा) आयोजन केलेले होते.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी २.० सरकारच्या प्रथम वर्षपुर्ती निमित्त रावेर-यावल विधानसभा मतदार संघाची ऑनलाइन सभा आयोजित करण्यात आली होती. . या ऑनलाइन सभेसाठी माजी पर्यटन मंत्री दोंडाईचे आमदार जयकुमार रावल यांनी विशेष मार्गदर्शन केले. जयकुमार रावल यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे यांना श्रद्धनजली वाहून सभेला सुरवात केली. .त्यांनी यावेळी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत वादळात केळी पिकाचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाईची कारवाई झाली नाही. अवाजवी विजबिलांचा प्रश्न तात्काळ सोडवावा. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर राज्य सरकार निष्क्रिय आहे असे मुद्दे मांडलेत. ऑनलाईन सभेमध्ये प्रदेश भाजपच्या व रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे, विभाग संघटनमंत्री ऍड. किशोर काळकर ,जिल्हा संयोजक नवलसिंग राजपूत , भाजप जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन , जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील , रावेर लोकसभा संयोजक नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद वायकोळे, भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षल महाजन इत्यादी मान्यवर सहभागी झाले. ऑनलाइन सभेचे नियोजन भाजपा रावेर तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केले.

Exit mobile version