Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर-यावलमधील मान्यवरांना दलीत साहित्य अकादमीचा पुरस्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे रावेर-यावल तालुक्यातील निवडक मान्यवरांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाले आहेत.

भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे रावेर-यावल तालुक्यातील निवडक मान्यवरांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात निंभोरा येथील सहकार क्षेत्रातील प्रल्हाद भाऊ बोंडे, रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे, गाते तालुका रावेर येथील सरपंच सुनीता तायडे तसेच गेल्या ३५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्‍या यावल येथील दैनिक चे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांचा समावेश आहे.

दिनाक ११ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली येथे भारतीय दलीत साहित्य अकादमी तर्फे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत. संपुर्ण देशामधुन निंभोरा येथील सहकार क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व प्रल्हाद भाऊ बोंडे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सहकार आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी आज पर्यंत सामाजिक , सहकार , शैक्षणिक , राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्याच्या कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे यांना डॉ. बाबा साहेब आंबेडकर फेलोशीप, गाते येथील सरपंच सुनीता बाळू तायडे यांना डॉ. बाबा साहेब आंबेडकर फेलोशीप तर यावल येथील देशदूत चे ज्येष्ठ पत्रकार तथा यावल तालुका प्रतिनिधी यांनी तब्बल ३५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात केलेली विविध कामगिरी महात्मा जोतिबा फुले फेलोशीप जाहीर झाली आहे.

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सत्यनारायण जटीया, रमेशचंद्र रत्न; डॉ. एम. एल. रंगा; डॉ.सोहनपाल सुमनाक्षर; निरज सेठी , माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम; प्रा.संजय मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, या पुरस्काराबद्दल चारही मान्यवरांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version