Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर बिडिओ अँक्शन मोडवर : दांड्याबहाद्दरांना शो-कॉज

रावेर, प्रतिनिधी । पंचायत समितीच्या मासिक बैठकीला दांड्या मारणा-या बहाद्दरांना आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दोन विभागांना शो-कॉज नोटीस तर इतर विभागांच्या वरीष्ठांना देखिल याबाबत कळविले आहे.

रावेर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला तालुक्यातील महत्वाच्या विभागाने दांड्या मारल्या होत्या. यावर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल अँक्शन मोड आल्या असून त्यांनी आज बाल विकास प्रकल्प व शालेय पोषण आहार विभागाच्या प्रमुखाना शो-कॉज बजावली आहे. . इतर विज पुरवठा विभाग, बस वाहतूक,पुर्नवर्सन विभाग, सार्वजनीक बांधकाम विभागातील सर्व दांड्या बहाद्दरांचा विषय त्यांच्या वरीष्ठांच्या लक्षात आणून दिल्याचे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले.

वेळेच्या आधिच कर्मचारी होतात गायब

रावेर पंचायत समितीला शासकीय वेळे आधिच येथील कर्मचारी घरी निघुन जातात. आज दिवसभर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल या कार्यालयात होत्या. परंतु, त्यांच्या आधिच त्यांच्या काही कर्मचा-यांनी कार्यालयातुन काढता पाय घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Exit mobile version