रावेर पीपल्स बँक निवडणूक : ५५ उमेदवारी अर्जांची विक्री

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर पिपल्स बँकेची रणधुमाळी सुरु असुन सोमवार तब्बल ५५ उमेदवारी अर्ज विक्री झाले असुन ७ जणांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजुन पुढचे ३ दिवस उमेदवारी अर्ज विक्री व स्विकारले जाण्यासाठी शिल्लक आहे. सहकार क्षेत्रातील पिपल्स बँकेत मोठी रस्सीखेस होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

 

रावेर पिपल्स बँकेचा बिगुल वाजुन पाच दिवस उलटले असुन पुढचे ३ दिवस अजुन शिल्लक आहे. अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी पिपल्स बँकेत यंदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे. ११ मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. लागोपाठ सुट्या आल्याने इच्छुक उमेदवारां कडून उमेदवारी अर्जच घेतली गेले नव्हते. सोमवारी ५५ अर्ज विक्री झाले असुन ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ६८ उमेदवारी अर्जची विक्री झाली आहे. रावेर नगर पालिकेची रंगीत तालीम म्हणून रावेर पिपल्स बँकेकडे पाहीले जाते.

Protected Content