Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी यास्मिन मुसरत शेख कलीम बिनविरोध

रावेर प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी यास्मिन मुसरत शेख कलीम यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी यास्मिन कलीम यांचा उपनगराध्यक्ष निवडीसाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रकियेसाठी मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी सहकार्य केले. यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, मावळते उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, गटनेते आसिफ मेंबर ॲड. सूरज चौधरी, प्रल्हाद महाजन, शेख सादिक, जगदीश घेटे, प्रकाश अग्रवाल, नगरसेविका संगिता महाजन, ललिता बर्वे, हमीदाबी पठान, संगिता वाणी आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यास्मिन मुरसत शेख कमील यांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version