Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे घरांची पडझड, अनेक भागात मोठे नुकसान

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यात मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ नुकसान झाले आहे. तालुक्यातील लालमाती येथे अनेक कुटुंबाच्या घरांची पडझड झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आले. केळीच देखिल नुकसान असून अनेक ठिकाणी विद्युततार खांबसहीत तुटून पडले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बंडू कापसे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

 

रावेर शहरासह आदिवासी पट्यात मंगळवारी ३० मे रोजी दुपारी वादळी पासवाने मोठे नुकसान झाले आहे. रावेर शहरात कैकाडीवाडा येथे लिंबाचे झाड कोसळुन ३ दुचकीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहीती कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत मदत केली व तहसीलदार बंडू कापसे यांच्याशी बोलून पंचनामे करण्यासाठी विनंती केली. लालमाती (ता रावेर) येथे देखिल घरांची मोठी पडझड़ झाली असुन अनेक घर कोसळली आहे. विद्युत तार तूटून पडले असून खांब देखील पडले आहे. घटनेची माहिती मिळताच लालमाती येथे कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, ग्राम पंचायत सदस्य रुपाली धनगर, योगेश धनगर संजू जमादार यांनी गावात नुकसानग्रस्त भागाला भेट देत मदत केली.

Exit mobile version