Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात मागील ४८ तासात कोरोनाचे १२६ नवीन रुग्ण ; एकाचा मृत्यू

 

रावेर, प्रतिनिधी । रावेर ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी व उपाय-योजनेच्या पाहणीसाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी संयुक्त पाहणी केली व जनतेनेला काळजी घेण्याचे अवाहन केले.

 

रावेर तालुक्यात सद्या ३ हजार ३०० कोरोना पेशंट बाधीत आहे तर ११२ जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यु झाला आहे. मागील ४८ तासात १२६ कोरोना बाधीत झाले असून एकाचा मृत्यु झाला आहे. तर शिंगाडी व तांदलवाडीत हॉटस्पॉट कायम आहे. आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी  पाहणी केली व कंन्टमेंट झोनला देखिल भेट दिल्या. 

खिर्डी,निंभोरा,दसनुर भागाची पाहणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासकीय टिमने आज शिंगाडी खिर्डी खु,खिर्डी बु, निंभोरा, दसनुर भागाची पाहणी केली व कंन्टमेंट झोनला देखिल भेट दिल्या. सोबत गावस्तरावर कोरोना समितीला गावात जन-जागृती करण्याच्या सूचना दिल्या. विना मास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना करण्यात आल्या.  सोबत नागरीकांनी अँटीजन टेस्ट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. 

खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय–बीडीओ

सद्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय आहे. हॉटस्पॉट असलेल्या गावांतील जनतेने स्वतःहून तपासणी करून घ्यावी. कोरोनाची ही दूसरी लाट असून पुढील काही महीने अत्यंत महत्वाचे आहे. खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय असल्याचा सल्ला गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी ग्रामस्थांना दिला.

 

Exit mobile version