Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात अवैध दारू भट्टीवर धाडी; तीन गुन्हे दाखल

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध दारू भट्टी व विक्रेत्यांवरील कारवाई सुरूच असून तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे की उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली रावेर तालुक्यात अवैध दारू व दारू भट्टे यांच्यावर पोलिसां कडून धडाकेबाज कारवाई करत पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा मोरव्हाल येथील पिंटू न्यामत तडवी यांच्या वर दाखल करण्यात आला असून त्याच्या कडून १ हजार ६०० दारू व तयार करायचे साधने तसेच जप्त केले आहे. दुसरा गुन्हा उज्ज्वला वाघोडे रा.मोरगाव यांच्या वर दाखल झाला असून त्यांच्या कडून सुमारे साडे तीन हजाराच्या ६८ प्लॅस्टिक सीलबंद बाटल्या तसेच तीन हजार सहाशेची प्लास्टिक डब्यात भरलेली ९० लिटर तयार दारू नष्ट करण्यात आली आहे. तर तिसरा गुन्हा मोरव्हाल येथील सुलेमान तडवी यांच्या वर दाखल झाला असून त्यांच्या कडे १हजार ६०० रूपयांची गावठी दारू मिळाली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई पो कॉ संदीप धनगर,पो हे कॉ निर्मला ननवरे आदी सहकार्यांनी केली आहे.

Exit mobile version