Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यातील निकृष्ट जलयुक्त शिवार कामांचा प्रश्न आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार: आ. शिरीष चौधरी

 

रावेर प्रतिनिधी तालुक्यातील सुमारे तेरा कोटीच्या निकृष्ट जलयुक्त शिवार कामांचा आगामी हिवाळी अधिवेशनात चौकशीचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

तालुक्यात जलयुक्तच्या कामांमध्ये मोठा भष्ट्राचार झाल्याचे लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने सुध्दा वृत्त प्रकाशित  https://wp.me/p7A6NV-qPN  केले होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाले होते. रावेर तालुक्यातील १९ गावांमध्ये सुमारे तेरा कोटी रुपये खर्च करून शासनाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी खर्च केल होते. त्यावेळच्या तात्कालीन अधिकारी व ठेकेदारांनी या पैस्यांची प्रचंड उधळपट्टी केली होती. या जलयुक्त शिवारचे बरेच कामे तालुक्यातील आदिवासी भागात झाले होते. परंतु, तेरा कोटी भष्ट्राचार व निकृष्ट कामांमुळे या भागात पाण्याची पातळी वाढली नाही. यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहेत.

रावेर तालुक्यात तेरा कोटी रुपये खर्च करून झालेल्या निकृष्ट कामांची आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशीसाठी राज्यसरकारने समिती गठीत केली आहे. तरी सुध्दा रावेर तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करण्या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे आ शिरीष चौधरी यांनी सांगितले.

तत्कालीन अधिकारी रडारवर

रावेर तालुक्यात जलयुक्त शिवार कामांची चौकशी मुद्दा विधानसभेत उचला जाणार असल्याने हे निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करणारे तत्कालीन अधिकारी रडारवर असणार आहे. त्यांच्याच दुर्लक्षामुळे जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फे-यात अडकली आहे.

Exit mobile version