रावेर तालुका भाजपा व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी गजानन भार्गव यांची नियुक्ती

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । रावरे येथे भाजपा कार्यालयात भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत गजानन भार्गव यांची रावेर तालुका व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 

यावेळी या बैठकीत भार्गव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवाजीराव पाटील, तालुका अध्यक्ष राजन लासुरकर यांनी नियुक्ती पत्र दिले. निवडीबद्दल माजी मंत्री आ. गिरीश महाजन, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खा. रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनताई पाटील, भाजपा किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीला जिल्ह्या उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी. माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहर अध्यक्ष जे.के. भारंबे, माजी सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, संतोष परदेशी, अतुल ओवे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content