Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात जीटीएलचे अकरा टॉवर सिल ; मोबाईल सेवा विस्कळीत

 

रावेर प्रतिनिधी ।कर थकविला म्हणून महसूल विभागाने रावेर तालुक्यातील जीटीएल कंपनीचे अकरा टॉवर सिल केले आहे. यामुळे इंटरनेट सेवा वापर करणा-यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

महसूल विभागाचा ६ लाख २३ हजाराचा कर थकविला म्हणून विभागातर्फे रावेर तालुक्यातील जीटीएल कंपनीचे ११ टॉवर सिल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची फटका मोबाईल ग्राहकांना बसला आहे. अचानक मोबाईल सेवा बंद झाल्याने मोबाईल ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याचा सर्वात जास्त फटका तालुक्यातील तांदलवाडी गावाला बसला आहे येथे सर्व मोबाइल इंटरनेट सेवा बंद आहे.

Exit mobile version