Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तहसिल कार्यालयात कोरोनासंदर्भात बैठक; पेट्रोलपंप चालकांना दिल्या सुचना

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसिल कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात पेट्रोलपंप चालक, प्रशासकीय आणि धान्य व्यापाऱ्यांना आवश्यक सुचना देण्यात आल्या तर वेग-वेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पेट्रोलपंपावर जावून पाहणी केली.

कोरोना संदर्भात झाली प्रशासकीय बैठक
तहसिलदार यांनी शासनाने दिलेल्या अटी-शर्ती व शासकीय पासेस असणा-यांनाच पेट्रोल देण्याचे अवाहन त्यांनी केले. यानंतर कोरोना वायरस संदर्भात प्रशासकीय महत्वाची बैठक झाली. यामध्ये तहसिलदार यांनी खबरदारी घेण्याचे सूचना दिल्या आहे. या बैठकीत बीडीओ सोनिया नाकाडे, सीईओ रविंद्र लांडे, जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन. डी. महाजन, शिवराज पाटील आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

धान्य व्यापाऱ्यांची घेतली बैठक
यानंतर सर्वात शेवटी शहरातील प्रतिष्टित धान्य व्यापाऱ्‍यांना बोलावून कोरोना या महाभयंकर वायरसमुळे लोकडाउन असल्याने गरीब कुटुंबाना धान्य वाटप करता यावे यासाठी त्यांना सहकार्य करण्याचे अवाहन करण्यात आली.

Exit mobile version