Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तहसिलदार कार्यालयात प्रतिज्ञापत्र सुविधा :- सजंय तायडे

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील विद्यार्थी पालकांची तसेच सर्वसाधारण नागरीकांची भटकंती थांबणार आहे. कारण रावेर तहसिलला प्रतिज्ञापत्र सुविधा सुरु झाली असून गरज असणाऱ्यानी लाभ घेण्याचे आवाहन निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांनी केले आहे.

मागील एक वर्षा पासून रावेर तहसिलला अँफेडेव्हीड (प्रतिज्ञापत्र) बंद होते.यामुळे नागरीक व विद्यार्थी यांची शैक्षणिक कामांसाठी तसेच पालकांची भटकंती होत होती. इतर पर्याय म्हणून नोटरी करावी लागत होती.परंतु आता रावेर तहसिलमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सातच्या दरम्यान निवासी नायब तहसिलदार यांच्या कक्षात अँफेडेव्हीड (प्रतिज्ञापत्र) करून देण्यात येणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांनी सांगितले.

शासनाची शेतक-यांकडे बाकी असलेले शेतसारा नजरा’ना इतर सर्व प्रकारची बाकी असलेले महसूल विभागाकडे जमा करावे शासनसुध्दा यासाठी शेतक-यांना सहकार्य करत असते विविध प्रकारचे बाकी असलेले कर भरण्याचे आवाहन निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांनी केले आहे.

Exit mobile version