Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर ग्रामीणमध्ये ड्यूरो ऑक्सिजनसाठी जमा झाली सुमारे पाच लाखांची लोकवर्गणी

 

रावेर प्रतिनिधी   ।  ग्रामीण रूग्णालयात जम्बो ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी लोकवर्गणी जमविण्याचे आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभला असून रावेर तालुक्यातील दानशुर व्यक्तीकडून  आतापर्यंत ४ लाख ८५ हजार रुपये जमा  झाले आहे.त.

रावेर ग्रामीण रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णाना ऑक्सिजन कमी पडत होते. येथे ड्योरो ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी लोकवर्गणी जमविण्याचे अवाहन तहसील प्रशासनातर्फे करण्यात आले होते. आता पर्यंत ४ लाख ८५ हजार रुपये चेक व कॅश स्वरुपात जमा झाले आहे. तसेच मागील वर्षी सुध्दा लोकवर्गणी जमा केलेला काही निधी शिल्लक आहे.

 ही तर अनियंत्रित लाट; तहसीलदार 

कोरोना संसर्गाची ही दुसरी अनियंत्रित लाट असल्याचे मत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी व्यक्त केली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आगामी १५ दिवस खूप कठीण आहेत. “ब्रेक द चैन” या शासन धोरणानुसार स्वत:ही शिस्त पाळावी लागेल आणि आपल्या आसपासच्या लोकांकडूनही पालन करून घ्यावे लागेल. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि लस याद्वारेच ही लाट आपण रोखू शकतो.  सद्य स्थितीत संपूर्ण प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा मागील वर्षापासून खूप मेहनत घेत आहे. त्यामुळे स्वत:ला, कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्क घाला, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, खूपच आवश्यक असेल तरच घराबाहेर निघा, विनाकारण फिरू नका आणि लस आवश्य घेण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनातर्फे केले आहे.

Exit mobile version