Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात शेतातून मक्याची चोरी; चोरट्यांविरोधात गुन्हा

रावेर प्रतिनिधी । मक्याच्या उभ्या पिकाची सुमारे २० हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्याने कणसे चोरून नेल्याप्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील विटावा येथील शेतकरी सचिन बाजीराव पाटील यांच्या बोहार्डे शिवारातील शेतात लागवड केलेल्या मक्याच्या उभ्या पिकातून अज्ञात व्यक्तीने १९ रोजी कणसे चोरून नेत २० हजार रुपयांचे नुकसान केलेले आहे. शेतमालक सचिन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोर्त्याविरूढ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जितेंद्र नारेकर करीत आहेत.

Exit mobile version