Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात महिलेने दिला चक्क तीन मुलांना जन्म !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात माऊली हॉस्पिटल मध्ये एका महिलेने तिन मुलांना (तिळ्यांना) जन्म दिला आहे. यामुळे शहरात एकच चर्चेचा विषय ठरला असुन तिघ मुलांची व आई प्रकृती व्यवस्थित आहे.स्त्रीरोग तज्ञ डॉ संदीप पाटील यांनी नॉर्मल डिलिव्हरी केली आहे.

 

रावेर शहरातील माऊली हॉस्पिटल येथे तिळ्यांना तीन मुलांना जन्म दिला आहे.  गुरुवार दि २७ रोजी सकाळी  १० वाजून ४५ मिनिट पहील्या बाळाला १० वाजून ५० मिनिट दुसऱ्या बाळाला तर १० वाजून ५५ मिनिटांनी तीस-या बाळाला कविता राजकुमार कापडे यांनी जन्म दिला. तिघेही बाळाची प्रकृती सुखरूप आहे.बाळाची आई कविता कापडे ही मध्य प्रदेशच्या लालबाग बऱ्हाणपूर येथील राहणारी असून, बहादरपूर येथील माहेर आहे. तिघही बाळ हे पायाळू जन्माला आलेले असून डॉ. संदीप पाटील यांनी नॉर्मल डिलिव्हरी केल्यामुळे व तिघही बाळ सुखरूप असल्याने राजकुमार दिलीप कापडे व सर्व नातेवाईक मंडळी यांनी डॉक्टर व त्यांच्या सहकार्य करणाऱ्‍यांचे आभार मानत कौतूक केले. अतिशय गुंतागुंतीची प्रसूतीला नॉर्मल प्रसूती करून तिघही बाळांची तब्येत सुदृढ असल्यामुळे व डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे परिसरात यासंदर्भात आनंदाची कौतुकाची चर्चा  आहे. डॉ.योगिता पाटील यांनी जन्माला आलेल्या बाळांचे तपासणी करून सर्वाची योग्यती जन्म पश्चात काळजी घेतलेली आहे. बातमी वाऱ्यासारखी रावेर शहरात पसरल्यानंतर गुरुवारी ब्रह्मा-विष्णू-महेश याचे रूपच जन्माला आल्याचे समजून माऊली हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी उसळली होती.

Exit mobile version