Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात मनसे अल्पसंख्यांक शहराध्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

 

रावेर, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर आज रावेर शहरतील असंख्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात शहराध्यक्ष महेमुद शेख इरफान शेठ अल्पसंख्या तालुकाध्यक्ष इमरान खान यांनी पक्षात प्रवेश दिला.

रावेरात आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची शहराची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील,किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील प. स. सदस्य दिपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोटू शेट, शेख सलिम गयास्सुदीन काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांना शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश दिला. यामध्ये अल्पसंख्या मनसे शहराध्यक्ष सईद खान यांच्यासह हसन खान, सत्तार खान, मोसिम खान, अब्दुल करीम, शेख दाऊद यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

Exit mobile version