Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात बंद कार्यालय फोडून मुद्देमाल लांबविला

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचे बंद कार्यालय फोडून २५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरातील शेख आरीफ शेख रऊफ (वय ३५) यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. रावेर शहरातील सावदारोड येथे यांचे कार्यालय असुन कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी पहाटे कार्यालयाचे शटर उघडून सुमारे २३ हजाराची बॅटरी व दोन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर असे एकूण २५ हजार रुपये किमतीच्या वस्तु चोरुन नेला आहे. याबाबत शेख आरीफ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना सुरेश मेढे करीत आहे.

Exit mobile version