Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात प्रितम शिरतुरे यांचा सत्कार

रावेर प्रतिनिधी । ग्रामविकास अधिकारी प्रितम शिरतुरे यांचा आज रावेर तालुका बौध्द समाजातर्फे सत्कार करण्यात आला.

येथील रहिवाशी ग्रामविकास अधिकारी आणि भुसावळ तालुक्यातील साकरी येथे कार्यरत असलेले प्रितम रघुनाथ शिरतुरे यांना शासनातर्फे नुकताच मुबंईत आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल आज रोजी रावेर तालुका बौध्द समाजातर्फे येथील फुले-शाहु-आंबेडकर वाचनालयात सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, माजी नगरसेवक अॅड. योगेश गजरे, सामाजिक कार्यकर्ते महेश तायडे व प्रदिप सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करून आयुष्यमान प्रितम शिरतुरे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, नगरसेवक जगदीश घेटे, भारतीय बौध्द महासभा जिल्हा संघटक विजय अवसरमल,अॅड. सुभाष धुंदले, अॅड. दिपक एच. गाढे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे, सचिव संघरक्षक तायडे, कोषाध्यक्ष धनराज घेटे, सामाजिक कार्यकर्ते महेश तायडे, दिलीप साबळे, पंकज वाघ, समता सैनिक दलाचे बाळु रजाने, सामाजिक कार्यकर्ते महेश लोखंडे,प्रा. मोहन लहासे, राहुल डी. गाढे, भास्कर वाघ, नितीन तायडे, राहुल राणे, निलेश तायडे, सिताराम वानखेडे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंलाचन संघरत्न दामोदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र अटकाळे यांनी केले.

Exit mobile version