Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात दुचाकीच्या धडकेत एक जखमी

रावेर प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने एकाला धडक देवून जखमी केल्याची घटना उटखेडा रस्त्यावर घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राज संतोष पाटील हा उटखेडा रस्त्यावरील डॉ. अनिल पाटील यांच्या दवाखान्यासमोरून जात असतांना मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी जोरधाव धडक दिल्याने राज पाटील हा जखमी झाला असून त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी विमलबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात दुचाकी चालक जयेश प्रवीण बिरपण रा. अजंदा ता. रावेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सतीश सानप करीत आहेत.

Exit mobile version