Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात मध्यरात्री तीन मोबाईल दुकाने फोडली

रावेर प्रतिनिधी । शहरातील एम.जी. मार्केट परीसर असलेले तीन मोबाईल दुकाने अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून मोबाईलसह रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. चोरीमुळे रावेरात खळबळ उडाली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरातील गजबजलेले ठिकाण महात्मा गांधी मार्केट परीसरात असलेले बाबा मोबाईल, सुनिल मोबाईल आणि खुशी मोबाईल दुकाने अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाची शटर उचकावून आत शिरून मोबाईल व रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीसात घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. तसेच चोरट्यांचा शोध घेण्याकामी श्वान पथक बोलाविण्यात आले आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय व रोजगार बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजंदारी नसल्याने तरूण मंडळी आता चोरी करण्याकडे वळले आहे. आज झालेल्या दुकाने फोडण्यासाठी चोरट्यांनी टॉमीचा वापर करण्यात आल्याचे लक्षात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Exit mobile version