Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

hanging rope

रावेर प्रतिनिधी । पाल येथे एका १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे पाल गावात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाल (ता. रावेर) येथे रात्रीच्या सुमारास अंकिता बाविस्कर या १९ वर्षीय युवतीने अज्ञात करणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे याबाबत रावेर पोलिसात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version