Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात जेष्ठ नागरिकांची पात्र-अपात्र यादीत नाव शोधतांना होतेय दमछाक

रावेर, प्रतिनिधी  । रावेर तहसील कार्यालयात सजंय निराधार योजनेच्या पात्र-अपात्र लाभार्थांच्या याद्या लावण्यात आल्या असून या याद्यामध्ये आपले नाव शोधण्यासाठी जेष्ठांचे  हाल होत आहे. त्यांना तासनतास उभे राहावे लागत असल्याने जेष्ठ नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

 

या बाबत वृत्त असे की, रावेर तहसील कार्यालयात सजंय निराधार योजनेच्या विविध  पात्र व अपात्र लाभार्थांच्या याद्या लावण्यात आल्या आहे. या याद्यामध्ये आपले नाव शोधण्यासाठी तालुकाभरातून जेष्ठ  व्यक्ती तहसील कार्यालयात येत आहे. आपले नाव शोधण्यासाठी भर उन्हात जेष्ठांना त्रास सहन करावा लागत आहे. लाभार्थ्यांमध्ये आपले नाव शोधण्यासाठी त्यांना तासनतास  उभे राहावे लागत असल्याने वृध्दामधुन संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने जेष्ठ नागरिकांना  कुठलीही बसण्याची व्यवस्था दिसली नाही. तसेच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

पात्र-अपात्रचीं यादी केली प्रसिध्द

मागील तिन मिटींगाची २ हजार पाचशे प्रकरणे असून त्यापैकी ७८३ प्रकरणे पात्र केली असून १ हजार ५२२ प्रकरणे अपात्र करण्यात आले आहे तर २९८ प्रकरणामध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहे.

 

Exit mobile version