Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा

रावेर प्रतिनिधी । शहरातील आंबेडकर चौकातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर रावेर पोलीसांनी कारवाई केली असून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रावेर शहरात मध्यरात्री १.३० रावेर पोलीस गस्त असतांना शहरातील आंबडेकर चौकात अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असतांना ट्रक्टर आढळून आले. ट्रॅक्टर थांबवून वाळू वाहतूकीचा परवाना मागितला असता मिळून आला नाही. चालक शेख सलमान शेख हसन (वय-२१) रा. रावेर याला पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील वाळूचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पो.कॉ. सुरेश मेढे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक शेख सलमान शेख हसन यांच्या विरूध्द गौणखनिज कायदा कलम ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. महेंद्र सुरवाडे करीत आहे.

Exit mobile version