Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरातील शासकीय कार्यालयासह आठवडे बाजारही बंद

रावेर प्रतिनिधी । कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील शासकीय कार्यालये ओस पडली आहे. दरम्यान आठवडे बाजार आणि गुरांचा बाजारही बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सुचना देण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस संदर्भात गर्दी टाळण्याचे अवाहन शासनाने केल्यानंतर नागरीकांकडून देखिल प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रमुख तीन कार्यालय महसूल विभाग, पोलिस स्थानक आणि पंचायत समिती विभाग येथे प्रचंड सन्नाटा पसरला आहे. अती महत्वाचे काम असले तरच शासकीय कार्यालयात नागरीक जाने पसंत करत आहे. दरम्यान येत्या आठवड्यातील आठवडे बाजार आणि गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Exit mobile version