Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरहून बसने परप्रांतीयांना सीमेवर सोडले

रावेर प्रतिनिधी । रावेर शहरातून पायी जाणारे परप्रांतीय लोकांसाठी महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत मोफत प्रवास पहीली बस रवाना करण्यात आली आहे. एसटी बस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या चोरवड पर्यंत सर्व प्रवाशांना सोडण्यात आले.

बस रवाना करतेवेळी रावेर नायब तहसीलदार सी.जी.पवार, रावेर आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे, मंडळाधिकरी सचिन पाटील, रावेर पोलिस कॉन्स्टेबल निलेश लोहार व चालक विलास तायडे आदी उपस्थित होते. पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार आणि पीडब्ल्यूडी विश्रामगृह व्यवस्थापक हेमंत बडगुजर हे ड्युटी व्यतिरिक्तही कित्येक दिवसांपासून या परप्रांतीयांची राहण्यापासून जेवणापर्यंत आणि प्रवासासाठी काळजी आणि व्यवस्था करत आहेत.

दरम्यान, या बसमध्ये २२ प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली होती. तर, बॉर्डरवरील चोरवड येथे या प्रवाशांना सोडल्यानंतर मध्य प्रदेश शासनाने त्यांना तेथून पुढे घेऊन जाण्यासाठी काही उपाययोजना किंवा नियोजित व्यवस्था केलेली आहे का? हा प्रश्‍न उपस्थित झालेला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असणार्‍या बर्‍हाणपूर शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना पॉझिटिव्हची संख्या रोज वाढत असून कोरोना ने मृत्यू झालेल्यांची संख्याही बर्‍हाणपूर शहरात वाढत आहे. बर्‍हाणपूर शहरात प्रवेश केल्यानंतर या परप्रांतीयांना सरळ त्यांच्या मार्गाला जाऊ दिले जाईल का? की त्यांना तिथेच क्वारंटाईन करण्यात येईल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version