Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरच्या पुरवठा निरीक्षकांची भुसावळला बदली

 

 

रावेर  :  प्रतिनिधी ।  रावेरचे  पुरवठा निरिक्षक हर्षल पाटील यांची  बदली  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भूसावळ पुरवठा शाखेत केली आहे  सोमवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढण्यात आले   आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढलेल्या  आदेशात  तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांना दिले आहेत. चौकशी दरम्यान पुरवठा निरीक्षक पाटील यांना या ठिकाणी या पदावर ठेवणे योग्य नसल्याने पाटील यांची येथून बदली केली आहे.असे सांगण्यात आले  प्रांताधिकारी चौकशी करून चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहेत.

 

अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे , प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे आदी कारणे या बदलीमागे सांगितली जात आहेत

 

शासनाने दिलेल्या फॉर्म बद्दल फेरबदल करणे  डीवन- ईडीवन जुळवणे त्यातून नव्याने यूनिट रजिस्ट्रर् लिहने हा उद्दीष्ट होता.हे तालुक्यात मागील पंधरा वर्षा पासुन झाले नव्हते तसेच हमीपत्र नव्याने सादर करणे पात्र की अपात्र यासाठी आहे. शिक्याचा वापर यासाठी केला गेला की फॉर्मचा गैरवापर होऊ नये व फॉर्म तहसिल कार्यालयातुनच गेले आहे.याची खात्री पटावी म्हणून केला आहे.हे सर्वेक्षण तालुक्यात राबवायच होते.यामुळे वरीष्ठाशी विचार-विनिमय करून केले आहे मी माझ्या मनाने काहीच केले नसल्याचे पुरवठा निरिक्षक हर्षल पाटील यांनी  सांगितले.

Exit mobile version