Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरच्या तहसिलदारांकडे खुलाशाची मागणी

 

रावेर : प्रतिनिधी । रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणात प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी रावेरच्या  तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना पुढच्या आठ दिवसात लेखी खुलासा मागितला आहे.

 

याबाबतचे पत्र रावेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे.

 

रावेर पुरवठा विभागाची दोनमहिन्यांपासुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशावरुन फैजपुरचे  प्रांतधिकारी कैलास कडलक चौकशी करत आहे. आतापर्यंत तालुक्यातील रेशन दुकानदारांचे लेखी खुलासे घेण्यात आले आहे.

 

रावेर पुरवठा विभागात शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून विक्री ,राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर  तसेच प्रति कार्ड ३ रुपयेप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री यासह इतर कारणांवरुन  तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना खुलासा मागीतल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले.

 

Exit mobile version