Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरचे पाच उपद्रवी संशयित १ वर्षाकरीता स्थानबध्द; नाशिकच्या कारागृहात रवाना

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील रावेर शहर हे गतकाळात दंगलीच्या कारणावरून वादग्रस्त ठरले आहे. भविष्यात दंगली घडू नये यावर आळा बसावा व रावेर शहरात शांतता अबाधित रहावी, याकरीत पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एमपीडीए कायद्यान्वये रावेरातील पाच उपद्रवी संशयित १ वर्षाकरीता नाशिक येथील कारागृहात स्थानबध्द केले आहे.

रावेर शहर हे जातिय दृष्या अतिशय संवेदनाक्षम शहर असल्याने दोन गटात जातीय वादातून दंगली होण्याची शक्यत अधिक प्रमाणावर असते. रावेर शहराचा इतिहास पाहता १९४६ मध्ये पहिली जातीय दंगल घडली होती. त्यानंतर आतापर्यंत दंगलीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अश्या गुन्ह्यांना आळा बसावा असे गुन्हे घडवून आणणरे गुन्हेगारांना कारवाई करून रावेर शहरात शांतता अबाधित रहावी] यासाठी शहरातील पाच संशयितांना १ वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

या पाच गुन्हेगारांना केले स्थानबध्द
मधुकार उर्फ मधु पैलवान रामभाऊ शिंदे (वय-६२) रा. शिवाजी चौक, रावेर, स्वप्निल मनोहर पाटील (महाजन) (वय-२६) रा. बक्षिपुर ता.रावेर, शेख मुकबुल अहमद शेख मोयीउद्दीन (वय-५७) रा. मन्यारवाडा रावेर, शेख कालु शेख नुरा (वय-५३) रा. मन्यारवाडा रावेर आणि आदिलखान उर्फ राजू बशिरखान (वय-२२) रा. फुकटपुरा रावेर यांच्यावर एक वर्षांकरीता स्थानबध्दची कारवाई केली आहे.

पाचही गुन्हेगारांचा स्थानबध्द करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज आदेश काढले. यासाठी पोलीस अधिक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, पो.नि. रामदास वाकोडे, सपोनि शितल नाईक, पोउनि संदीप पाटील, मनोज वाघमारे, पो.शि. दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरीख्‍ पोना. महेश महाजन, स.फौ. राजेंद्र करोडपती, विजय जावरे, पो.ना. नंदू महाजन, महेंद्र सुरवाडे, ज्ञानेश्वर चौधरी, तुषार मोरे, सुरेश मेढे, जितेंद्र पाटील, मंदार पाटील, पुरूषोत्तम पाटील, मनोज म्हस्के, निलेश लेहार, इस्माईल शेख, भरत सोपे, नितीन झांबरे, जितेंद्र जैन यांना संबंधित पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेवून २० सप्टेंबर २०२० पासून १ वर्षाकरीत मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.

Exit mobile version