Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरचे तत्कालीन पुरवठा निरिक्षकांची होणार चौकशी

रावेर, प्रतिनिधी ।  जिल्हाभरात गाजलेले रावेर पुरवठा विभागाच्या तत्कालीन पुरवठा निरिक्षक हर्षल पाटील यांच्या चौकशीला येत्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले. 

शासकीय अर्जात परस्पर बदल करणे,अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे असा प्रकरचा ठपका तत्कालीन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्कालीन पुरवठा निरिक्षकांची बदली करून कर्तव्यात कसूर कोणी केला ? याची चौकशी करण्यात येणार आहे.  या प्रकरणात फैजपुर प्रांतधिकारी कैलास कडलक हे चौकशी अधिकारी आहेत. आता या प्रकरणाची  येत्या आठवड्यापासुन चौकशीला सुरुवात होणार आहे. तालुक्यात सर्वाधिक चर्चेला जाणारे या प्रकरणाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

Exit mobile version