Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी महाविद्यालयात ‘फॅब्रिकेशन क्लब’चे उद्घाटन

जळगाव, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता फॅब्रिकेशन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबचे उद्घाटन करण्यात आले आहे.

 

फॅब्रिकेशन क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, प्रा. सौरभ गुप्ता, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिपेनकुमार रजक, प्रा. वसिम पटेल, प्रा. अविनाश पांचाल, प्रा. अमोल जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
फॅब्रिकेशन क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेतून टाकाऊ वस्तू गोळा करत एका आर्टीफिशीअल घुबडाची निर्मिती केली आहे. बहुतेकदा रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना आपण जात असलेल्या ठिकाणाचा योग्य मार्ग माहित नसतो त्यामुळे बऱ्याचदा अशा नागरिकाचे हाल होतात व त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे भविष्यात या नागरिकांसाठी फॅब्रिकेशन क्लबच्या विध्यार्थ्यानी निर्माण केलेली आर्टीफिशीअल घुबड उपयुक्त ठरणार आहे. सर्व बाजूनी चाचणी केल्यानंतर हि घुबड नागरिकांना गोंधळात टाकणाऱ्या चौकात स्थापन करण्यात येईल व त्यानंतर रस्ता विसरलेल्या नागरिकाला अचूक रस्ता दाखविण्याचे काम हि घुबड करणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात नागरिकांना फायदा होणार असून सध्या या प्रकल्पावर विद्यार्थ्यांचे अजून काम सुरु आहे.

Exit mobile version