Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी महाविद्यालयातर्फे उमाळा परिसरात वृक्षारोपन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे मैत्री दिनाचे औचित्य साधून उमाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास रॉटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट विध्यार्थी सदस्यांच्या व एमबीए विभागाच्या विध्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.

झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे तसेच वातावरणात ऑक्सीजन निर्माण करण्यासाठी झाडे महत्वाची आहेत. झाडामुळे जमिनीची गुणवत्तात व हवेची गुणवत्ता सुद्धा वाढविली जाते हे पटवून देत या बरोबरच वृक्षसंवर्धनाची शपथही विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. अग्रवाल यांनी दिली. या वेळी वड, पिंपळ, कडूलिंब, गुलमोहर इत्यादी वृक्षाचे वृक्षारोपण उमाळा परिसरात करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटचे सदस्य यश लढढा, लक्ष्मी शेलार, विवेक पाटील, कांचन माळी, लोकेश पारेख, संभव मेहता, साक्षी वाणी, संदेश तोतला, विवेक वाणी, ज्ञानल बोरोले, काजल बारी, दिव्यांका सोनवणे, पूजा चौधरी, प्राजक्ता पाटील, जयराज चव्हाण, हर्षदा मोगरे, हर्षाली पाटील, जागृती निकम, राधिका दायमा, मंजिरी वाळके, मानसी पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तर एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. परिशी केसवानी, प्रा. डॉली मंधान यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले.

Exit mobile version