Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात “जागतिक पर्यावरण दिन” साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील  रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, “फस्ट क्लब” व इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सील अंतर्गत “जागतिक पर्यावरण दिन” साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी रायसोनी महाविद्यालयाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब, रुद्राक्ष, कदंब, देशी चिंच, जांभूळ, बहावा, हिरडा, बेहडा या औषधीयुक्त १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रामुख्याने या औषधीयुक्त झाडांचा उपयोग होतो.

 

या वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी पर्यावरणाचे महत्व सांगत ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना राबवली पाहिजे. अनेकदा वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न होतात परंतु लावलेल्या झाडांचे नंतर काय होते याकडे लक्ष दिले जात नाही. दुर्लक्षामुळे जमिनीत लावलेली झाडे फारशी टिकत नाहीत.त्यासाठी आता वृक्षारोपण करणे व त्याचे संगोपन करणे काळजी गरज आहे. वृक्षारोपणाचा विचार एकदा पक्का झाला की आपोआप आपले हात वृक्ष संगोपनाकडे वळू लागतील. त्यामुळे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करा, असे ते म्हणाले.

 

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅकेनिकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील,  राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. वसिम पटेल व रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. जितेंद्र वडद्कर यांचे सहकार्य लाभले तसेच यावेळी विध्यार्थ्यानी पर्यावरण रक्षणाचे विविध पोस्टर तयार करत पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली. या कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Exit mobile version