Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात तंबाखू विरोधी दिन साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात १०६.४ एफएम रेडीओ ऑरेंज जळगाव, इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सील विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला.

 

महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचम हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे, डॉ. प्रशांत चोपडा व दंत शल्यचिकित्सक डॉ. पूजा भारंबे उपस्थित होत्या. त्यांनी तंबाखूमध्ये आढळणारं कार्बन मोनोऑक्साइड आणि निकोटीन हे तुमच्या तोंडासाठी अनेक प्रकारे नुकसानदायक ठरू शकते. तंबाखूच्या सेवनाने दातांवर डाग पडणे, तोंडाला दुर्गंधी येणे, दात पिवळे पडणे असे दुष्परिणाम होतात. याशिवाय तंबाखूचा वारंवार उपयोग केल्याने गळा, तोंड आणि एसोफंगल कॅन्सर होण्याचा धोकाही जास्त असतो. असे सांगत त्यांनी तंबाखू सेवनाचे विविध दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे, यांनी आपल्या खास शैलीत घोषवाक्याद्वारे तंबाखूविरोधी जनजागृती करणाऱ्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले कि, तंबाखूमुक्त भारत करण्यासाठी उपाययोजना ही तेवढीच ताकतीची करावी लागेल. आजची युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात लवकर अडकत आहे. यासाठी सर्व सामाजिक स्तरावरूनच प्रयत्न करावे लागतील. शाळेत-महाविद्यालयात तंबाखूविरोधी उपक्रम राबविणे. शालेय स्टेशनरीवर तंबाखूविरोधी, जनजागृती विषयी घोषवाक्य लिहून ठेऊ शकता. विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी प्रबोधन होण्यासाठी व्याख्यान आयोजित करता येतील. तसेच रॅली काढणे, नाटक सादर करून जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबवता येतील. महाविद्यालय स्तरावर तंबाखू विरोधी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा इत्यादी आयोजित करून प्रबोधन करता येईल. अशाप्रकारे सर्व  स्तरातुन संस्कार केले गेले तर निरोगी, सदृढ, व्यसनमुक्त आणि बलशाली नागरिक नक्कीच घडतील. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी तंबाखूविरोधी शपथ ग्रहण केली. तसेच तंबाखूचे विविध दुष्परिणाम याचे वास्तवरूपी चित्र विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मांडले. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वास्तविक दर्शनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

 

एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, प्रथमवर्ष विभागप्रमुख जितेंद्र वडदकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी स्टुडट कॉसीलचे यश लढढा, गौतम पांडे, अक्षया दाणी, देवश्री भक्कड, भाविका घाटे, रिया तळेले, कन्हैया चौधरी, सुनैना राजपूत, आदिती वाणी, यशराज पाटील, स्वप्नील श्रावणे या विध्यार्थ्यानी कार्यक्रमासाठी सहकार्य केले तर  कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी वसीम पटेल व १०६.४ एफएम रेडीओ ऑरेंजचे जय अरोरा यांनी तर कार्यक्रमाचे आभार १०६.४ एफएम रेडीओ ऑरेंजचे संकेत नेवे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी आणि बहुसंख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होते

Exit mobile version