Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनीअन्सने जाणले दिवाळीचे ५ दिवसांचे महत्व

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रेमनगर येथील बी.यू.एन. रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी दिवाळी हषोत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिवाळीच्या ५ दिवसांचे महत्व विद्यार्थ्यांच्या वेशभुषेवरुन शिक्षकांनी सांगितले.

तसेच प्रत्येक दिवस कसा साजरा करावा व त्यादिवशी कोणाचे पूजन केले जाते. हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्या – त्या देवतेचे पेहरावाचा सजीव देखावा सादर करण्यात आला. त्यासाठी काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जसे – गाय-विवेक मंडाळे, वासरु-वेदांत, कुबेर-स्मित चोपडा, धन्वंतरी – रितेश पेटकर, लक्ष्मी- पूर्वा बऱ्हाटे, गणपती- अवनेश वर्मा, सरस्वती-पूर्वा खडसे, बळीराजा- हिमांक माथुर, वामन – विराज दसरे, यांनी सादरीकरण केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज शिरोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रदूषण विरहीत दिवाळी कशी साजरी करावी ते समजावून सांगितले. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, शाळेचे उपाध्यक्ष उमेद रायसोनी व पालक शिक्षक संघाचे सदस्य यांनी मुलांचे कौतुक करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 

Exit mobile version