Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायपूर येथील सरपंच विरोधात अविश्वासाच्या ठरावाला मंजूरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथील सरपंचाच्या ठिसाळ कारभाराविरोधात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अविश्वासाचा ठराव तहसीलदार नामेदव पाटील यांनी अविश्वासाचा ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रविण परदेशी यांनी गुरूवारी ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीत ७ सदस्य निवडून आले आहे. त्यात निर्वाचित संरपच म्हणून रजनी नितीन सपकाळे या काम पाहत आहे. सरपंच यांच्या ठिसाळ कारभारामुळे येथील ग्रामपंचायतीचे इतर सदस्यांनी संरपंच रजनी सपकाळे यांच्या विरूध्द अविश्वासाचा ठराव तयार केला आहे. त्यात म्हटले आहे की, सरपंच म्हणून काम करतांना रजनी सपकाळे हे ग्रामपंचायत कामांचे शासकीय कागदपऋे व दस्तावर स्वाक्षऱ्या करीत आहेनाी. त्यामुळे गावातील कोणतेही काम होत आहे. ग्रामपंचायतीचे काम करतांना सदस्यांना विश्वासात घेत नाही, सरपंच पती नितीन सपकाळे हे शासकीय कामात हस्तक्षेप करत आहेत. रायपूर हद्दीतील अतिक्रमण काढण्याबाबत कोणताही निर्णय घेत नाहीत. रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या प्रस्तावावर सही करण्यास नकार दिला जात आहे. ग्रामसभा घेण्यास नकार देत आहे. निधीचा दुरूपयोग करून इतर सामान खरेदी केले जात आहे. यासह इतर कामांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. या अनुषंगाने इतर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव तयार करून जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांना पाठविण्यात आला होता. त्यानुसार तहसीलदार नामदेव पाटील यांनी रायपूर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेवून अविश्वासाचा ठराव मंजूर केले आहे. या सभेला प्रविण लक्ष्माण परदेशी, वसंत सिताराम धनगर, उषाबाई दिलीप परदेशी, पुष्पा सिताराम परदेशी, शितल चेतन परदेशी, संगिता अनिल इंगळे आणि रजनी नितीन सपकाळे यांच्यासह ग्रामसेवक आदी उपस्थित होते. अशी माहिती अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रविण परदेशी यांनी गुरूवारी ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दिली.

Exit mobile version